Posts

Showing posts from May, 2024

डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे

Image
डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे. डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे.     सांगोला प्रतिनिधी               एकतर सध्या राजकारणाची पध्दत झपाट्याने बदलत आहे.राजकारणातुन पैसा व त्याच पैश्यातुन पुन्हा सत्ता मिळविणे हे नित्याचेच झाले आहे.तसेच पक्ष बदलणे,विचारधारा बदलणे,झेंडे बदलणे सहकारी बदलणे या घटनांनी तर कळसच गाठला आहे .कोणता नेता कोणत्या नेत्यांबरोबर आहे हे समजेपर्यंत फाटाफुट झालेली ऐकायला मिळते.एवढी बजबजपुरी राजकारणाची झाली आहे.अशा राजकिय वातावरणात महाराष्ट्रातील निष्कलंक चारित्र्य संपन्न  नेते आयुष्यभर लाल बावटा खांद्यावर घेऊन काम केलेले स्व.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचा आदर्श घेऊन...त्यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत डाँ भाई बाबासाहेब देशमुख  यांनी जाहीरपणे सांगीतले आहे की ज्या जनतेने आबासाहेब यांच्यावरती  नितांत प्रेम केले ,विश्वास दाखवुन ११ वेळा आमदार म्हणुण निवडुन दिले त्य...

निसार काझी आणि मित्र परिवाराने पुन्हा एकदा वाचवले जखमी कोल्ह्याचे प्राण

Image
        आज सकाळी शिवणे परिसरातील एखतपुर शिव रास्त्या जवळील खडी क्रेशर समोर एक कोल्हा जखमी अवस्थेत दिसला .याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते निसार काझी यांनी घटनस्थळाला तत्काळ भेट देवून त्या जखमी कोल्ह्याला मलमपट्टी करून प्रथमोपचार केले.. सदर माहिती वनविभाग सांगोला यांना कळवून वण अधिकाऱ्यांच्या हाती सुरक्षित सुपूर्द केले..मुक्या प्रण्याप्रती जागरूकता दाखवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते निसार काझी , वैभव कोळेकर , शशिकांत जानकर अमोल वाघमोडे या तरुणांनी परिश्रम घेतले..निसार काझी आणि त्यांचा मित्र परिवार नेहमीच सामाजिक प्रश्न सोडवण्यात अग्रेसर असतात..त्यांच्या अतुलनीय सामाजिक कार्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी ,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक

Image
शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी ,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक..‌.         जाहीर आवाहन        सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकारी,नेते व प्रमुख कार्यकर्ते यांना कळविण्यात येते कि.....    शनिवारी दि १०/१२/२०२२ रोजी दुपारी १२-०० वाजता महुद येथे दत्त नगरी सांगोला रोड पेट्रोल पंपाशेजारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे...   तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे..... विषय १) गडचिरोली येथे झालेल्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीत निर्णयावर चर्चा करणे.....    २)पक्ष‌ संघटना मजबूत करणे... ३) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती चर्चा करणे...         आपला विश्वासू       दादासाहेब बाबर   तालुका चिटणीस शेकापक्ष ------------------------------------

सांगोला तालुक्यात अजुनही आबासाहेब यांच्या नावाचा दबदबा आहेच : भाई चंद्रकांत सरतापे शेकाप प्रसिध्दी प्रमुख

Image
सांगोला तालुक्यात अजुनही आबासाहेब यांच्या नावाचा  दबदबा आहेच  : भाई  चंद्रकांत सरतापे शेकाप प्रसिध्दी प्रमुख.            अजुनही आबासाहेबांच्या नावाचा दबदबा आहेच..... -------------💪--------------- सांगोला येथे‌ महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे धडाकेबाज भाषण झाले... त्यांच्या भाषणात बहुतांश वेळा त्यांनी स्व आबासाहेबांचे नाव घेतले...आणि आसे आबासाहेबांचे नाव घेणाऱ्या त्या ‌पहिल्याच नेत्यां नाहीत...तर याही अगोदर अनेक पक्षाचे अनेक नेते सांगोला तालुक्यात आले त्या प्रत्येकांनी आबासाहेबांच नाव घेतले आहे..कारण आबासाहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.राजकारणाच्या पलीकडे त्यांचेकडे लोक पहातात...या अगोदर मा शरदचंद्र पवार साहेब,मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा सुशीलकुमार शिंदे साहेब,मा विजयसिंह मोहिते पाटील,मा ना. रामदासजी आठवलेसाहेब, स्व पतंगराव कदमसाहेब, खा.संजय पाटील साहेब,बळीराम साठेजी, पुरुषोत्तम बेरडेजी,सुभाषबापु पाटील,अजितदादा पवार साहेब, स्व सुधाकर पंत परीचारक मालक,मा आदित्य ठाकरेजी, स्व आर आर पाटीलजी,स्व ...

सांगोला शेकाप नेत्यांनी सीईओंसमोरच केली पोलखोल जलजीवनमध्ये कोट्यवधीचा घपला

Image
  सांगोला शेकाप नेत्यांनी सीईओंसमोरच केली पोलखोल जलजीवनमध्ये कोट्यवधीचा घपला  जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांच्या कामाची चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याविरुध्दही न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. सांगोला :- सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमतून सुमारे एक हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. या कामांची मंजूरी करण्याच्या प्रक्रियेत नियमांना हरताळ फासून कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा कारंडे, संगम धांडोरे, गजेंद्र कोळेकर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, समाधान पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत जलजीवन मिशनमधील गैरप्रकाराची माहिती पत्रकारांना दिली. सांगोला तालुक्यामध्ये लक्ष्मी नगर , कटफळ , वाटंबरे ,...

डॉ. बाबासाहेब देशमुख करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार शेकापचे आज शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात आंदोलन

Image
डाँ. बाबासाहेब देशमुख  करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार शेकापचे आज शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात आंदोलन Home Sangola डॉ. बाबासाहेब देशमुख करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार शेकापचे आज शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात आंदोलन डॉ. बाबासाहेब देशमुख करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार शेकापचे आज शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात आंदोलन February 08, 2023  डॉ. बाबासाहेब देशमुख  करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार शेकापचे आज शक्तिप्रदर्शन करीत सोलापुरात आंदोलन बाबासाहेब करणार नेतृत्व, शेकडो कार्यकर्ते वाहनाने निघणार भाई गणपतराव देशमुख यांचे पहाडी आवाजातील भाषण कार्यकर्त्यांच्या अंगावर रोमांच उभे करीत असे. कार्यकर्ते कानात जीव आणून त्यांचे भाषण ऐकत असत.  भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर सोलापूर शहरात शेकापचे प्रथमच आंदोलन होत आहे. विशेष म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांची हुबेहूब प्रतिरूप असलेले त्यांचे नातू, अभ्यासू युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. सांगोला तालुक्यात शेकापची सत्ता असलेल्या ग्रामपंचायत...

तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी। होईल - डॉ.भाई बाबासाहेब देशमुख‌

Image
    तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी।      होईल - डॉ.भाई बाबासाहेब देशमुख‌     आमदारांचे गणित ऐकून अनेकांच्या घराची राखरांगोळी, जनताच तुमचा हिशोब करेल   सांगोला (प्रतिनिधी): सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिशोब, गणित घालायला विद्यमान  सांगोल्याचे आमदार माहीर आहेत. गेल्या तीस वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण आहे. अशा हिशोबातूनच १९९९ ला हेच आमदार जेलवारीही करून आले आहेत. असे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केली आहे. त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल, या कडक शब्दांत शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना इशारा दिला.   टेंभूच्या पाण्याचे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं, आमच्या नादाला लागू नका या शब्दांत आ. शहाजी पाटील यांनी माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख यांच्यावर टीका करत नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आव्हान दिले ह...

जलजिवन मिशन अंतर्गत कामे न करताच किमान चार कोटीची बिले अदा...

Image
जलजिवन मिशन अंतर्गत कामे न करताच किमान चार कोटीची बिले अदा...!

बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणास भाई जयंत पाटील उपस्थित राहणार

Image
बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणास भाई जयंत पाटील उपस्थित राहणार सांगोला (प्रतिनिधी): पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे फॅबटेक सुतगिरणी जवळील भव्य पटांगणावरती खुल्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या खिलार जनावरांची संख्या कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थिती मध्ये खिलार जनावरांच्या प्रजाती कायम टिकाव्यात. या उद्देशाने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा सहभागी होणार असुन सदर शर्यतीवरती सी.सी.टि.व्हि च्या माध्यमातुन निरीक्षण केले‌ जाणार आहे.  विजेत्या प्रथम क्रमांकास आबासाहेब केसरी व रोख रुपये २,५१,०००/- रुपये, दुसऱ्या क्रमांकास २,००,०००/- रुपये तिसऱ्या क्रमांकास १,५०,०००/- रुपये , चौथ्या क्रमांकास १,००,०००/- पाचवे क्रमांकास ७५,०००/-रुपये , सहाव्या क्रमांकास ५०,०००/-‌रुपये, तर सातव्या क्रमांकास २५,०००/- रुपये अशी भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत.     सदर विजेत्यांना गुरुवार द...

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी फलटण येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख

Image
हक्काचे पाणी मिळविण्यासाठी फलटण येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख सांगोला (प्रतिनिधी):- निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण कार्यालय येथे सर्व शेतकऱ्यांनी सोमवार दि.१३/५/२०२४ रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन हक्काचे पाणी मिळवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, संभाजीराजे शिंदे यांच्या उपस्थितीत फलटण कार्यालयावर जाऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सांगोला, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. निरा उजवा कालव्याला जे पाणी आले ते पाणी १५ दिवसा अगोदरच बंद करण्यात आले आहे जे पाणी आले ते सुध्दा कमी दाबाने सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे भरणे पुर्ण झाले नाही. आज सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत...