सांगोला तालुक्यात अजुनही आबासाहेब यांच्या नावाचा दबदबा आहेच : भाई चंद्रकांत सरतापे शेकाप प्रसिध्दी प्रमुख

सांगोला तालुक्यात अजुनही आबासाहेब यांच्या नावाचा  दबदबा आहेच  : भाई  चंद्रकांत सरतापे शेकाप प्रसिध्दी प्रमुख.

  
        अजुनही आबासाहेबांच्या नावाचा दबदबा आहेच.....
-------------💪---------------
सांगोला येथे‌ महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचे धडाकेबाज भाषण झाले... त्यांच्या भाषणात बहुतांश वेळा त्यांनी स्व आबासाहेबांचे नाव घेतले...आणि आसे आबासाहेबांचे नाव घेणाऱ्या त्या ‌पहिल्याच नेत्यां नाहीत...तर याही अगोदर अनेक पक्षाचे अनेक नेते सांगोला तालुक्यात आले त्या प्रत्येकांनी आबासाहेबांच नाव घेतले आहे..कारण आबासाहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते.राजकारणाच्या पलीकडे त्यांचेकडे लोक पहातात...या अगोदर मा शरदचंद्र पवार साहेब,मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा सुशीलकुमार शिंदे साहेब,मा विजयसिंह मोहिते पाटील,मा ना. रामदासजी आठवलेसाहेब, स्व पतंगराव कदमसाहेब, खा.संजय पाटील साहेब,बळीराम साठेजी, पुरुषोत्तम बेरडेजी,सुभाषबापु पाटील,अजितदादा पवार साहेब, स्व सुधाकर पंत परीचारक मालक,मा आदित्य ठाकरेजी, स्व आर आर पाटीलजी,स्व वसंतराव काळे जी, स्व भारतनाना भालकेजी,मा दिलीप‌ सोपलजी , मा आ.अनिलजी बाबर मा भरणे मामाजी,प्रा. लक्ष्मण ढोबळेजी,आ.समाधान आवताडेजी,आ.बबनदादा‌शिंदेजी, मा.राजन पाटीलजी, यांच्या सहित वेगवेगळ्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आबासाहेबांच्या कामाचे कौतुक या पुर्वी केले आहे‌... त्यांचे नाव सभेमध्ये अनेक वेळा घेतलेही आहे...
  तेच काम सुषमाताई अंधारे यांनी केले आहे.....
   बर एक सांगा... उगीचच कोण कोणाचे नाव घेत नसते त्याला निष्कलंक,चारीत्रसंपन्न रहावे लागते तसे आबासाहेब राहीले म्हणुन तर सगळेच आबासाहेबांचे नाव अदबीने घेतात. अहो  मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जरी सांगोला दौऱ्याला  आले तरी ते सुध्दा आबासाहेबांचे नाव‌ भाषणात घेणारच..
कारण पक्ष जरी वेगवेगळे असले तरी.. नितीमत्ता  हा प्रकार अजुनही आहे म्हणुनच आबासाहेबांचे नाव आजही अदबीने घेतले जाते..
    भाई चंद्रकांत सरतापे
       प्रसिद्धी प्रमुख शेकाप

Comments