हक्काचे पाणी मिळविण्यासाठी फलटण येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख
हक्काचे पाणी मिळविण्यासाठी फलटण येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख
येथे उद्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - डॉ भाई बाबासाहेब देशमुख
सांगोला (प्रतिनिधी):- निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण कार्यालय येथे सर्व शेतकऱ्यांनी सोमवार दि.१३/५/२०२४ रोजी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन हक्काचे पाणी मिळवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, संभाजीराजे शिंदे यांच्या उपस्थितीत फलटण कार्यालयावर जाऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सांगोला, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
निरा उजवा कालव्याला जे पाणी आले ते पाणी १५ दिवसा अगोदरच बंद करण्यात आले आहे जे पाणी आले ते सुध्दा कमी दाबाने सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे भरणे पुर्ण झाले नाही. आज सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जनावरांना सुध्दा पिण्यासाठी पाणी नाही. एवढी पाण्याची तारांबळ निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात जर पाऊस वेळेवर पडला नाही तर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. राज्य सरकारने सांगोला तालुका या पुर्वी दुष्काळी म्हणून घोषित केलेला आहे तरीही पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची अजिबात उपाययोजना केलेली नाही.. दुष्काळाच्या परिस्थीती मध्ये ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे ते न करता चालु पाणी सुध्दा यांनी बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
एकतर शेती व्यवसाय पुर्णतः अडचणीत असताना शेतकरी आपली उपजिवीका करण्यासाठी दुध व्यवसायाकडे वळालेला आहे.. अशा परिस्थीत दुधाला दर नाही.. व जनावरांना चारा तर नाहीच पिण्यासाठी सुध्दा पाणी नाही अशा बिकट अवस्थेत शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे. राजकीय दबावापोटी पाणी सोडणे बंद करणे हे प्रकार राजकीय दबावाखाली घेते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाण्याचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी पक्ष भेद विसरून पाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे काही नेत्यांकडुन पाण्याचे राजकारण होताना दिसत आहे.
नियमानुसार निरा उजवा कालवा हा २० मे अखेर चालवणे अपेक्षीत असताना ९ ते १० तारखेलाच पाणी बंद करण्याचे आदेश आलेले आहेत व पाणी बंद करण्यात आल्यामुळे अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद अवस्थेत येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पुर्ण क्षमतेने पाणी यावे व ते पाणी वेळेवर यावे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने फलटण येथील कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा फलटण कार्यालयावर उपस्थित रहावे असे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
Comments
Post a Comment