डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे
डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे.
डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सर्वसामान्य नेतृत्व : भाई चंद्रकांत सरतापे.
सांगोला प्रतिनिधी
एकतर सध्या राजकारणाची पध्दत झपाट्याने बदलत आहे.राजकारणातुन पैसा व त्याच पैश्यातुन पुन्हा सत्ता मिळविणे हे नित्याचेच झाले आहे.तसेच पक्ष बदलणे,विचारधारा बदलणे,झेंडे बदलणे सहकारी बदलणे या घटनांनी तर कळसच गाठला आहे .कोणता नेता कोणत्या नेत्यांबरोबर आहे हे समजेपर्यंत फाटाफुट झालेली ऐकायला मिळते.एवढी बजबजपुरी राजकारणाची झाली आहे.अशा राजकिय वातावरणात महाराष्ट्रातील निष्कलंक चारित्र्य संपन्न नेते आयुष्यभर लाल बावटा खांद्यावर घेऊन काम केलेले स्व.गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचा आदर्श घेऊन...त्यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांनी जाहीरपणे सांगीतले आहे की ज्या जनतेने आबासाहेब यांच्यावरती नितांत प्रेम केले ,विश्वास दाखवुन ११ वेळा आमदार म्हणुण निवडुन दिले त्या ऐतिहासिक जनतेची सेवा करणे हे माझे कर्तव्य व भाग्य समजतो असे सांगुन राजकारणाच्या माध्यमातुन सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्याचे जाहिररित्या सांगीतल्याने व डाँ बाबासाहेब देशमुख यांचा निस्वार्थपणे समाजसेवा करण्याच्या संकल्पामुळे अनेकजण डाँ बाबासाहेब देशमुख यांचे नेतृत्व मान्य करु लागले आहेत.एकतर डाँ बाबासाहेब देशमुख हे सुध्दा स्व. आबासाहेबांप्रमाणे अभ्यासु वृत्ती ,शांत स्वभाव असलेले आबासाहेंबाप्रमाणे बोलण्याची पध्दती , आबासाहेबांप्रमाणे दांडगा जनसंपर्क असल्याणे विशेषतः चालणे बोलणे सुध्दा आबासाहेबांप्रमाणेच असल्याने वयोवृध्द , तरुण सर्वच जण बाबासाहेबांना प्रती आबासाहेब म्हणु लागले आहेत....हे कमावणे तितकेसे सोपे नाही,अशामुळे लोकांना बाबासाहेब आपलेसे वाटतात .
छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहु महाराज , महात्मा जोतिबा फुले, विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, थोर संत रोहिदास महाराज, संत बसवेश्वर महाराज, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, विष्णुपंत दादरे अशा राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसा कुठलीही तडजोड न करता पुढे चालविण्याचे काम डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे प्रामाणिकपणे करत आहेत .हिंदु असो या मुस्लिम या बौध्द सर्व समाज बांधवांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतात. यामुळेच सर्व जाती धर्माच्या लोकांना डाँ भाई बाबासहेब देशमुख हे आपलेसे वाटतात.
राज्यातील मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनास स्वतः भाग घेतल्याने व मराठा , धनगर आणि मुस्लिम आरक्षणास जाहीर रित्या पाठींबा दिल्याने डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रती कामाचा माणुस अशी प्रतिमा तयार झाली. तसेच जे पक्ष संविधान बदलणयाची उघडपणे भाषा करतात त्यांच्या विरोधात जो भारतीयांमध्ये जनप्रक्षोभ आहे व संविधान वाचविण्यासाठी जी लढाई चालु आहे त्या लढाईमध्ये सहभाग दर्शवल्याने डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रती लढवय्या म्हणुम प्रतिमा तयार झाली आहे .
विज, पाणी, दुधाची दरवाढ जनावरांची चारा समस्या अशा अनेक गोष्टी साठी आंदोलने केल्याने शेतकरी वर्गाला डाँ बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कष्टकरी जनतेचे नेते वाटु लागलेत अशा विविध कारणांमुळे डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वावरती सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेने शिक्कामोर्तब केले असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दिप्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment